Breaking News
Trending

ठाण्याच्या काही भागात शुक्रवार-शनिवारी पाणी पुरवठा बंद

टप्प्याटप्याने एकवेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन

ठाणे : (अतुल तिवारी) ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९.०० ते शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी स. ९.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण २४ तास पाणी पुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

परिणामी, शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी स. ९.०० ते रा. ९.०० पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार, दि. ०२ मे, २०२५ रोजी रा. ९.०० पासून शनिवार, ०३ मे, २०२५ रोजी स. ९.०० वाजेपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणी पुरवठा बंद राहील.

शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे आणि चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button