कबुतरांन पासून ..सावधान.. ठाणे व पनवेल महानगर पालिका ची चेतावनी
त्याच्यापासून मानवी आरोग्याला विविध आजारांचा धोका आहे.

कबुतरांन पासून ..सावधान.. ठाणे व पनवेल महानगर पालिका ची चेतावनी
कारण त्याच्यापासून मानवी आरोग्याला विविध आजारांचा धोका आहे.
त्यांना पाळणे, खायला घालणे, लाड करणे, सर्वांना आवडते. मात्र असे करत असाल तर सावधान. या कबुतरांमुळे फुप्फुसाचे विकार व ऍलर्जीची बाधा होत आहे. दम व श्वसनाच्या इतर व्याधी पाठीशी लागण्याबरोब फुप्फुस निकामी होण्याचाही धोका आहे.
आपल्या परिसरात अनेक पक्षीप्रेमी पुण्य कर्म म्हणून कबुतरांना नित्यनेमाने खायला घालतात. अनेक गावे, शहरात कबुतर पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र अनेक ठिकाणी अनेकांना गंभीर आजाराना सामोरे जावे लागले आहे. चार वर्षांपूर्वी कबुतरांना खायला घालण्याच्या सवयीमुळे एका सुशिक्षित तरुणीचे फुप्फुस निकामी झाल्याचे समोर आले. एका संशोधनानुसार कबुतरांची विष्ठा आणि पिसे(पीजन ड्रॉपिंग्ज)या मध्ये बुरशी अर्थात आयस्परजीला फंग्स आढळून आलेत. त्यांच्या संपर्कात आल्याने ऍलर्जी होते. हायपरसेन्सिटीव्ह नुमोनाईट्सहिा फुफ्फुसाचा आजार होतो. फुफ्फुसात शवसनाद्वारे ऑक्सिजन घेणाऱ्या वायूकोषाबाहेरील आवरणाला सूज येते. त्यामुळे वायूकोषात ऑक्सिजन घेण्याचे प्रमाण कमी होऊन दम लागायला लागतो.
कबुतरांच्या विष्टेमुळे मनुष्याला दमा, ऍलर्जी, खोकला, धाप लागणे, शवसनाशी संबंधित साठ प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. कबुतरांच्या पासून 100 मीटर परिघातील व्यक्तींना त्रास होतो. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या ऍलर्जीबाबतचे संशोधन इंडियन जर्नल ऑफ ईमुनोलॉजी अँड रेस्पिरेटरी मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले आहे.