Breaking News
Trending

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वाघ-बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन

संपादक अतुल तिवारी

गुजरातमधील प्रसिद्ध वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन हॅमरेजमुळे देसाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेली अनेक दिवस ते व्हेंडिलेटवर होते. १५ ऑक्टोंबर रोजी बाहेर पडले असताना त्यांचा अपघात झाला. देसाई हे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात ते पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.

या अपघातानंतर देसाई यांना अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार देसाई यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसंच निधन होण्यापूर्वी सात दिवस ते व्हेंटिलेटरवर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button