सर्व नागरिकांना विनम्र आवाहन !
हे ‘मॉक ड्रिल’ पूर्णतः सरावासाठी घेण्यात येत असून, घाबरून जाण्याचे बिलकुल कारण नाही. :- निरंजन डावखरे आमदार
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार
बुधवार ७ मे २०२५ रोजी ‘मॉक ड्रिल’ करिता सायरन वाजवण्यात येणार आहे.
युद्धजन्य परिस्थितीत प्रशासन किती सज्ज आहे हे पडताळून पाहण्यासाठी हे ‘मॉक ड्रिल’ घेण्यात येत आहे.
युद्धकाळातील उपायांचा सराव या ‘मॉक ड्रिल’ अंतर्गत घेतला जाणार असून या दरम्यान नागरिकांनी युद्धजन्य परिस्थिती आणि हवाई हल्ल्यादरम्यान स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण नेमके कसे करावे या संदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ही एक रंगीत तालीम असून, नागरिकांनी शांततापूर्वक सहकार्य करावे , ही विनंती!