ठाणे ग्रामीणमध्ये कशेळी मोफत छत्री वाटप उपक्रम राबवला
ठाणे, कशेळी – पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख मा. डॉ. देवानंद थळे यांच्या वतीने भाव रेसिडेन्सी, कशेळी येथील रहिवाशांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून पावसात दैनंदिन प्रवास करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रहिवाशांनी या उपक्रमाचे स्वागत करत डॉ. थळे यांचे आभार मानले.
भाव रेसिडेंसी फेडरेशन चे अश्विन चौधरी, अतुल तिवारी, तुलसी दास होबडे, हनुमंत गोसावी, अश्विन गुप्ता इत्यादी पदाधिकारी मौजूद होते.
शिवसेनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी विविध उपक्रम राबवले जात असून, यावर्षीचा हा उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरला आहे.