ज्ञानेश्वर ज्ञान मंदिर इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केली रामलीला

ठाणे

ज्ञानेश्वर ज्ञान मंदिर इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केली रामलीला

(ठाणे) चरई येथील ज्ञानेश्वर ज्ञान मंदिर इंग्लिश हायस्कूलमध्ये माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी रामलीला सादर केली . नवरात्र व दुर्गा पुजा यासोबतच रामलीलेचे सादरीकरण केले गेले. चांगल्याची वाईटावर मात हा संदेश देत रावणाचे दहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राम, सीता, लक्ष्मण, विभिषण, शूर्पणखा व रावण यांच्या भूमिका साकारत आपल्या उत्तम अभिनयाने त्यात रंग भरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या रामलीलेच्या माध्यमातून आजच्या पिढीला रामायणाची माहिती व त्या मागील संदेश समजला. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. रूपाली मंडलीक, पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ प्रणाली पाताडे व सर्व शिक्षकवर्गही उपस्थित होता. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे रामलीलेचे सादरीकरण उत्साहात पार पडले.

Exit mobile version