महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 16वे राज्यस्तरीय अधिवेशन ठाण्यात मोठ्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 16वे राज्यस्तरीय अधिवेशन ठाण्यात मोठ्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न

ठाणे:अतुल तिवारी
समाजाने, उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत करावी.-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
प्रसार माध्यामाचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही कमकुवत होईल, त्यामुळे समाजानेच माध्यामाची उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत करावी. पत्रकारांनी ही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी म्हणजे विश्वास वाढेल.असे सांगुन प्रबोधनचे मार्केटिंग होणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले.पत्रकार संघाच्या मागण्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही ही दिली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,चे सोळावे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायातन सभागृहात मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी दोन सत्रात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, मनिष केत, नितीन जाधव याच्यसह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातुन पाचशे पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी मराठी पत्रकरीतेचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती यावर नेमके पणाने बोट ठेवले.पत्रकाराच्या हत्या आणि अटक याचा उल्लेख करत पत्रकारांन समोरील धोके स्पष्ट केला. लोकशाहीत पत्रकार हा चौथा खांब असल्याने लोकशाही ची इमारत मजबूत आहे.बदलत्या परिस्थिती त माध्यमांचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही ची कमकुवत होईल.त्यामुळे समाजानेच माध्यामाची उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत केली पाहिजे.त्यासाठी पत्रकारांनी ही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी.म्हणजे लोकांचा वृत्तपत्रांवरील विश्वास वाढेल. आपल्या बाबत कोणाच्या सांगण्यावरून दिलेल्या दोन बातम्याची उदाहरणे देऊन त्यांनी पत्रकरीतेतील चुकीच्या बाबीबरही परखड मत मांडले.पण अपवाद वगळता पत्रकारांमुळेच समाजच प्रबोधन होत त्यामुळे प्रबोधनचे मार्केटिंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे अवाहन ही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ च्या कामाचे कौतुक करून केंद्री स्तरावरील मागण्यांसाठी मदत करण्याची ग्वाही दिली.तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वृत्तपत्र व पत्रकारांसमोर समस्या आणि वृत्तपत्र आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे तर या क्षेत्रात काम करणाऱ्या ना रोजगाराचे स्थैर्य मिळेल.असे सांगुन पत्रकार संघ च्या वर्षे भरातील कामाचा अहवाल सादर केला.सरचिटणिस विश्वास आरोटे व कोकण विभागिय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले
.यावेळी मान्यवरांचा हस्ते पारसनाथ रायकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जेष्ठ नगरसेवक संजय तरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं,मराठी उद्योजक पुरस्कार उद्यमी महाराष्ट्र ओंकार हरी माळी,ज्येष्ठ नाट्यनिर्माते स्वर्गीय दादाजी घोसाळकर यांना कलारत्न तसेच तरुलता धानके यांना प्रसशासकीय भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समता वाकडे यांना सामाजिक पुरस्कार व डॉक्टर शिरूळकर वैद्य यांना सामाजिक पुरस्काराने राजेंद्र खारकर – समाजरत्न पुरस्कार जितेंद्र पाटील – समाजरत्न पुरस्कार मिलिंद पूर्णपत्रे – क्रीडारत्न पुरस्कार शेखर सुपटकर – संगीत व कलारत्न पुरस्कार अक्षय मालवणकर – सास्कुतिक पुरस्कार शशिकांत नाईक सर – क्रिडाभूषण पुरस्कार सुनिल मोरे – कलाभूषण पुरस्कार प्रशांत देशमुख – साहित्यिक पुरस्कार निळकंठ मोहीते- कोरोना योद्धा पुरस्कारसचिव सागर शिंदे- कोरोना योद्धा पुरस्कार डॉ.श्री. मनीलाल रतिलाल शिंपी – कोरोना योद्धा पुरस्कार डॉक्टर स्वामी शिरकुल वैदु -सामाजिक
दिलीप थोरवे – शैक्षणिक पुरस्कार भीमाशंकर तोरमल – शैक्षणिक पुरस्कार भालचंद्र घुगे -प्रशासकीय पुरस्कार डॉ बाबासाहेब गोडगे. आयुवैर्दिक समता चांदुरकर वाकडे – सामाजिक पुरस्कार आंनद धर्मा -विशेष पत्रकारिता पुरस्कार सन्मनित करण्यात आले
तसेच यावेळी प्रमुख मान्यवर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील व धडक कामगार युनियनचे अधक्ष अभिजीत राणे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हाअध्यक्ष यांचा देखील सत्कार करण्या आला यावेळी वैभव स्वामी मराठवाडा विभागीय अध्यक्ष, बाळासाहेब देशमुख विदर्भ प्रमुख, किशोर रायसाकड खान्देश विभागीय प्रमुख, प्रवीण सपकाळे उत्तेरमहाराष्ट्र अध्यक्ष, शरद नागदेव विदर्भ पूर्व सचिव, सागर जोंधळे मुंबई विभागीय प्रमुख, महेष पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष , नितीन शिंदे सिद्धार्थ तायडे विभागीय अध्यक्ष उपस्तीत होते ठाणे शहर पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेऊन यशस्वी रित्या पार पाडले