भागीदारी मध्ये फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर आर्थिक गुन्हे शाखेने केले गुन्हे दाखल
भागीदारी मध्ये फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर आर्थिक गुन्हे शाखेने केले गुन्हे दाखल

भागीदारी मध्ये फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर आर्थिक गुन्हे शाखेने केले गुन्हे दाखल
ठाणे ( प्रतिनिधी ):- ठाणे कोलबाड येथे राहणाऱ्या रमेश गुप्ता यांचा भिवंडी येथे कपड्याचा व्यवसाय आहे,आणि त्याचे कार्यालय वृंदावन सोसायटी येथे आहे, रमेश गुप्ता यांचे मित्र मन्सूर नाकाडे व परवेज शेख यांनी रमेश गुप्ता यांना आपला बिल्डिंग मटेरियल स्टील सप्लायचा व्यवसाय मोठ्या तेजीत चालला असल्याचे सांगितले आता हा व्यवसाय कमी प्रमाणात आहे पण ह्यात जास्त भांडवल टाकले तर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालेल असे सांगितले तसेच रमेश गुप्ता यांना विश्वासात घेऊन ह्या व्यवसायात भागीदार होऊन पैसे टाकण्यास सांगितले, व जो नफा होईल तो आपण वाटून घेऊ,या वर रमेश गुप्ता यांनी माझ्या कडे पैसे नाहीत पण माझी प्रॉपर्टी आहे असे सांगितले, त्या वर परवेज व मन्सूर यांनी तू तुझी प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेव व त्यावर पैसे घेऊन ते आपल्या व्यवसायात गुंतवणूक कर व त्यातून आलेल्या नफ्यातून आपण बँकेचे हफ्ते भरू व नंतर बँकेकडून प्रॉपर्टी सोडवून घेऊ, त्यांनी सांगितल्या या तिघांनी मिळून 17/09/2014 रोजी NS इंटरप्राइजेस नावाची पार्टनरशिप फर्मची नोंदणी केली,आणि त्याचे कार्यालय रमेश गुप्ता यांच्या खोपट येथील कार्यालयात सुरु केले व NS एंटरप्राईजेस तर्फे 7000 रुपये भाडे देण्याचे ठरले,त्या नंतर डोंबिवली नागरी सहकारी बँक शाखा फोर्ट येथे तिघांच्या नावाने व सहीने खाते उघडण्यात आले, रमेश गुप्ता यांनी आपला विमल हाईट्स खारेगाव येथील फ्लॅट आयसीआय बँके मध्ये गहाण ठेऊन 64,00,000/- रुपये डोबिवली नागरी सहकारी फोर्ट येथील NS इंटरप्राइजेसच्या खात्यात जमा केले, बँकेचा सर्व व्यवहार मन्सूर आणि परवेज हे दोघेच पाहत होते आणि चेकच्या सही साठी कोणीही दोन जण ग्राह्य होते, त्या मुळे ते दोघेच सही करत होते,बँकेचे हफ्ते NS इंटरप्राइजेसचे तर्फे भरले जात होते, पण काही महिन्यांनी ह्या दोघांनी परत पैशाची गरज आहे असे रमेश गुप्ता यांना सांगितले आणि त्यांच्या कडे पैशाची मागणी केली, त्या प्रमाणे रमेश गुप्ता यांनी आपली टिटवाळा येथील प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेऊन 50,00,000/- लाखाची सी सी मंजूर करून ती रक्कम NS इंटरप्राइजेसच्या खात्यात वळती केली याचे हफ्ते सुद्धा NS भागीदार फर्म भरेल असे सांगितले, पण काही महिन्यांनी रमेश गुप्ता यांना बँकेची नोटीस आली बँकेचे हफ्ते भरले नसल्यामुळे त्यांचा गळा सील करून लिलाव करण्यात येणार आहे, त्यामुळे रमेश गुप्ता यांनी डोंबिवली नागरी सहकारी बँकेत असलेली 15,00,000/-एफडी मोडून हे पैसे बँकेत भरले, त्या नंतर मन्सूर आणि परवेज यांनी पैशाची तातडीची गरज असल्याचे रमेश गुप्ता यांना सांगितले त्या प्रमाणे गुप्ता यांनी मित्रांकडून 20,00,000/- रुपये उसने घेऊन ते NS इंटरप्राइजेस मध्ये भरले हे पैसे त्यांनी सात दिवसात परत करण्याच्या बोलीवर रमेश गुप्ता कडून घेतले होते,त्यांनी या दोघांकडे पैशाची मागणी करताच या दोघांनी रमेश गुप्ता यांना टाळण्यास सुरुवात केली, रमेश गुप्ता यांनी या दोघांकडे हिशोब मागितला असता तो देण्यास टाळाटाळ करू लागले,बँकेने या तिघांना मिटिंग साठी बोलावले असता त्यातील मन्सूर आणि परवेज यांनी 2 करोडच्या वर रुपये अजून येण असल्याचे सांगितले, त्या नंतर या दोघांनी रमेश गुप्ता यांना न सांगता कोकण मर्कांटाईल बँक शाखा माजगांव येथे NS इंटरप्राइजेस नावाचे दुसरे अकाउंट उघडले व जे ग्राहकांकडून येणारे चेक या बँकेत टाकायला सुरुवात केली, रमेश गुप्ता यांच्या नावाचे खोटे रिटायरमेंट डिड बनवून त्यावर खोट्या सह्या करून ते बँकेला दिले, बँकेचे हफ्ते देणे सुद्धा बंद केले, त्या मुळे रमेश गुप्ता यांनी फ्लॅट विकून बँकेचे पैसे भरले,रमेश गुप्ता यांनी आता पर्यंत ह्या दोघांना 2,08,95,898 रुपये दिले आणि त्या पैकी 1,40,09,924 परत केले आहेत तर 57,46,994 रुपये येण असल्या मुळे आणि व्यवसायातले बरेच पैसे बाकी असल्या मुळे रमेश गुप्ता यांनी मन्सूर व परवेज यांच्या वर खोटी नोटरीचे पेपर बनवून NS इंटरप्राइजेसचे खोटे रिटायर्मेंट डिड बनवून त्या वर खोट्या सह्या केल्या बद्दल, व दुसऱ्या बँकेत अकाउंट उघडून त्या मध्ये चेक वटवल्या बद्दल 420,465,467,468,471,34 प्रमाणे राबोडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.तो आर्थिक गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला आहे.पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.